काजव्यांच्या लुकलुकण्यामागे मोठे विज्ञान आहे. या कीटकाच्या शेपटीकडील शेवटच्या दोन घडय़ांच्या निमुळत्या भागात म्हणजेच पोटाखाली प्रकाशमय पेशी असतात. या पेशीमध्ये ल्यूसिफेरीन नावाचे एक प्रथिन असते. या प्रथिनावर ल्यूसिफेरेज या विकराची क्रिया होते. यासाठी ऊर्जेची गरज असते आणि त्यामध्ये ऑक्सिजनचाही सहभाग असतो. या जैविक रासायनिक क्रियेमधून ऑक्सिल्युसिफेरीन हा प्रकाशमय घटक तयार होतो, हाच तो काजव्यांचा लुकलुकणारा प्रकाश.