मान्सूनच्या सुरुवातीला पावसाच्या चार-पाच प्रदीर्घ सरीनंतर होणारे काजव्यांचे आगमन पाहून आपणास रात्री चांदण्याने फुललेला आसमंतच भूतलावर आला आहे की काय असा भास होतो. काजवा हा लहान भुंग्यासारखा, माणसास निरुपद्रवी असणारा कीटक. ध्रुवीय प्रदेश वगळता जगभरात त्याच्या तब्बल दोन हजार प्रजाती आढळतात.