निसर्गात वाहत्या नदीकाठी मिळणाऱ्या शाडूपासून मूर्ती निर्माण करण्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. नैसर्गिक रंग वापरलेली शाडूची मूर्ती लहान असावी आणि उत्सव संपल्यानंतर तिचे नदीच्या वाहत्या पाण्यात विसर्जन करावे, ही परंपरा होती. शाडूचे एक वैशिष्टय़ म्हणजे ती पाण्यात सहज विरघळते, मात्र तिच्यापासून पुन्हा मूळ शाडू मिळत नाही.