रोषणाईच्या जगतात क्रांती घडवणाऱ्या ‘लाईट एमिटिंग डायोड’चा (एल.ई.डी.चा) शोध १९६२मध्ये लागला. शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाने त्यात सुधारणा होत आजचा रंगीबेरंगी, प्रदूषणविरहित, टिकाऊ, निमिषार्धात चालू बंद होणारा असा बहुगुणी एल.ई.डी. आपल्याला मिळाला.