आपण मूठभर माती हातात घेतो तेव्हा त्या मुठीमध्ये शेकडो वर्षे बंद झालेली असतात, या मातीने कितीतरी वादळे, कडक उन्हाळे, मुसळधार पाऊस, गोठवणारी थंडी, पाहिलेली असते तेव्हाच तर तिला हे मूर्त स्वरूप प्राप्त झालेले असते.